आहारसंहिता- श्यामा रानडे
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांप्रमाणे भारतासह अनेक विकसित व विकसनशील देशांत हृदयविकार, अतिरक्तदाब, मधुमेह,सांधेदुखी यांसारख्या जीर्णत्वसदृश विकाराचे आणि कर्करोगासारख्या गंभीर विकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ह्याचे महत्वाचे कारण आहे, लोकांचे चुकीच्या आहारपध्दतीतील खाद्यपदार्थांचे अमर्याद आकर्षण. अशा परिस्थितीत प्रत्येक सुजाण व्यक्तीला सुयोग्या आहार कसा असावा या विषयी निश्चित कल्पना असणे महत्वाचे आहे. म्हणूनच आरोग्यसंपन्न ,विकारविरहित आणि कार्यक्षम जीवनासाठी शास्त्रीय माहितीच्या पायावर आधारलेली ही आहारसंहिता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिसस्पर्शाने लाखो दलितांना स्वतःमधला 'राजहंस' शोधण्याची प्रेरणा मिळाली. ही कहाणी अशाच एका 'राजहंस' कुटुंबाची आहे.
या पुस्तकात उलगडल्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासाच्या आठवणी. त्या बाबासाहेबांचे बहुरंगी, मनोहर दर्शन घडवतात.
Bhidu Bhagawan Ingale भिडू भगवान इंगळे ग्रंथाली प्रकाशन जो अंत:करणाला भिडतो, तो भिडू. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर लेखकाला जे मित्र भेटले, त्यांच्या जीवनातील भयाण वास्तवामुळे ते अस्वस्थ झाले. अशा भिडूंची ही जीवनकहाणी
Eka Purna Apurna Neela Satyanarayan एक पूर्ण - अपूर्ण नीला सत्यनारायण ग्रंथाली प्रकाशन नीला सत्यनारायण यांच्या 'एक पूर्ण- अपूर्ण' या पुस्तकात दु:खाचे अग्निपंख लावून आयुष्यात आलेल्या दाहक अनुभवाला हसत हसत कवटाळलेल्या ईची हृदयद्रावक कथा वाचायला मिळते.
'ह्रदयस्थ' ही कहाणी आहे नितू मांडके या बिनधास्त , महत्वाकांक्षी मराठी माणसाची. त्यांचं शल्यकौशल्य, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि भव्य स्वप्नं हे सारं यथार्थपणे उभं केलंय त्यांच्या सहचारिणीने.
'मैत्र जीवाचे' श्री. विदुर महाजन हे एक उद्योजक आणि प्रख्यात सतारवादक. त्यांचा वीस वर्षांचा मुलगा, मैत्रेय, एका अपघातात हे जग सोडून गेला. हा आघात सोसणं महाजन कुटुंबास खूप कठीण होतं. या दु:खातून सावरण्यासाठी श्री. विदुर महाजन यांनी डायरी लिहायला सुरुवात केली. मग सुरू झाला एक शोध - जीवनमृत्यूचा, सुखदु:खांचा, मानवी अस्तित्वाचा व नात्यांचा आणि कलेचाही. तेच हे तत्त्वचिंतनपर लेखन -'मैत्र जीवाचे'. म्हटलं तर श्री. महाजन यांचं व्यक्तिगत, पण प्रत्येक संवेदनशील माणसाला अर्थपूर्ण जगण्यासाठी बळ देऊ शकेल असं.
बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधना आमटे हामाणूस माझे नाव या मिश्रनाट्याचा विषय आहे.
Manus Navache Jagane Dr Ravindra Thatte माणूस नावाचे जगणे डॉ. रविंद्र थत्ते
ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या आधारे केलेले 'माणुसकी'बद्दलचे विवेचन.
Part 1 डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर काम करण्यासाठी श्री. विलास मनोहर १९७५ साली हेमलकशाला दाखल झाले. प्रकल्प सुरू होऊन वर्ष झालं होतं. दारिद्र्य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे. प्रकल्पावरच्या दवाखान्यात येणारे आदिवासी प्राणी मारल्यावर त्यांची पिल्लं प्रकाशकाकांना आणून देत.
Nishani Dava Angatha Ramesh Ingale निशाणी डावा अंगठा रमेश इंगळे उत्रादकर निशाणी डावा अंगठा ही रमेश इंगळे- उत्रादकरांची कादंबरी म्हणजे स्वातंत्र्याची पन्नास वर्षे उलटून गेल्यावरही जगातील सर्वात मोठा निरक्षर देश म्हणून विख्यात असलेल्या आपल्या देशातील प्रौढ- साक्षरता अभियानाच्या जिल्हास्तरीय शोकांतिकेचा एक फार्स आहे.
- per page












