Home :: Marathi Books :: Travel :: Gavakadachi America - गावाकडची अमेरिका
Gavakadachi America - गावाकडची अमेरिका

Gavakadachi America - गावाकडची अमेरिका

Price: $15.00 (Rs735.00)
Quantity
Gavakadachi America गावाकडची अमेरिका : डॉ. संजीव चौबळ
न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस, शिकागो म्हणजे काही अमेरिका नाही. या मोठ्या अतिप्रगत शहरांच्या अल्याड-पल्याडदेखील दुसरी एक अमेरिका विखुरलेली आहे. साधंसुधं जीवन जगणारी, शेतात राबणारी, शहरी जीवनाचा वारा न लागलेली, देवभोळी - प्रसंगी कर्मठ धार्मिक - अशी ही ' ग्रामीण अमेरिका'.

Free shipping within US.
SKU Bk-US-04
Weight 0.25 lbs
Udhyogpanth:उद्योगपंथ
Vivek Aani Vidroh:विवेक आणि विद्रोह
Pani Anna Aani Lokasankhya:पाणि, अन्न आणि लोकसंख्या
He Sarva Kothun Yete?:हे सर्व कोठून येते?
$2.07
$3.47
$2.72
$3.38
Udhyogpanth:उद्योगपंथ Vivek Aani Vidroh:विवेक आणि विद्रोह Pani Anna Aani Lokasankhya:पाणि, अन्न आणि लोकसंख्या He Sarva Kothun Yete?:हे सर्व कोठून येते?
 
Yashawantarao Te Vilasrao  :  यशवंतराव ते विलासराव
Lokariche Mohaka Kroshe Vinakam:लोकरीचे  मोहक क्रोशे विणकाम
Elgaar: एलगार
Play \'N Learn Marathi - Level 1
$6.57
$2.44
$2.35
$12.99
Yashawantarao Te Vilasrao : यशवंतराव ते विलासराव Lokariche Mohaka Kroshe Vinakam:लोकरीचे मोहक क्रोशे विणकाम Elgaar: एलगार Play 'N Learn Marathi - Level 1

Product rating

Sign in to rate

Customer Reviews

  • Author: Dr Padma Mullick
    This book is great !
    How did you make it-would be a stupid question to ask. I mean it is not easy. In spite of your busy routine you still grabbed all these observations, developed them and reproduced them so beautifully with the brush of a scientist. Look at the research-it is awesome !
    I would have appreciated more photographs.
    I am going to gift some to my friends.
  • Author: R. V. Paranjape
    This is a beautiful book. The language is very simple, precise and honest. Your ability of 'keen observer' is visible. All the pictures are relevant.

    When I started reading this book, I didn't know what the contents are exactly. The book was up to the expectation and has provided great insight.
  • Author: चिदानंद पाठक
    ‘गावाकडची अमेरिका ’ हे डॉक्टर संजीव चौबळ यांनी लिहिलेले एक आगळे वेगळे पुस्तक वाचनीयच नव्हे तर संग्रहणीय आहे . अमेरिकेला पर्यटनासाठी जावून आलेल्या अनेकांची प्रवास वर्णने चाकोरीतील न्यूयोर्क, माडीसन अवेन्यू , सेन्ट्रल पार्क , वाशिंग्टन , डिस्नेलांड , हॉलीवूड , नायगारा याभोवती फिरत राहतात . नाही म्हणायला अनिल अवचट यांचे ‘अमेरिका ’ हे प्रवासवर्णन थोडे पठडी बाहेरचे आणि वाचनीय होते . परंतु अमेरिकेच्या ग्रामीण भागातील लहान गावातील फार्म वर शिक्षण आणि व्यवसायाने पशुवैद्य असलेल्या एका अस्सल मुंबईकराने शब्दबद्ध केलेले अमेरिकेचे वर्णन वाचकांना खूप भावेल असे आहे .

    ओघवती संस्कारित भाषा , प्रत्यक्ष अनुभवतो आहोत असे वाटायला लावणारी वर्णनशैली , अगदी बारीक सारीक तपशील डोळ्यापुढे उभे करणारी निरीक्षणशक्ती , एक विषय घेवून त्याच्या मुळापर्यंत सर्वार्थाने पोचण्यासाठी घेतलेले परिश्रम आणि केलेले संशोधन , सत्यता पटविण्यासाठी दिलेले सबळ पुरावे अशा अनेक जमेच्या बाजू . तिकडल्या प्रदेशात आणि वातावरणात पूर्णपणे समरस होवूनही अनेक प्रसंगी भारतातील परिस्थती , माणसे यांची येणारी आठवण लेखकाची नाळ अजूनही स्वदेशाशी जोडलेली आहे हे लक्षात येते . स्वतः काढलेली रेखाचित्रे व नकाशे लेखकाच्या अनेकविध पैलूंची ग्वाही देतात . अनेक ठिकाणी माहिती साठी संख्या शास्त्रीय आकडेवारी दिली आहे . ती मधून मधून न देता शेवटी परिशिष्टात दिली असती तर व्यत्यय न येता सलग वाचन करता आले असते . अर्थात हे केवळ वैयक्तिक मत आहे , तो दोष समजला जावू नये .

    अनेक बाबतीत भारत अमेरिकेपेक्षा मागासलेला असूनही तिकडले ग्रामीण जीवन , खेडेगावातील माणसे , आपल्या सारखे जुन्या परंपरा , धर्म , रीतीरिवाज , रूढी , अंधश्रद्धा ,संस्कृती जपणारी आहेत हे वाचून मजा वाटते . इथल्या प्रमाणेच तिथेही मोठी शहरे व खेडी यांच्या जीवन धाटणीत प्रचंड तफावत असल्याचे कळते .

    डॉक्टर चौबळ यांचे हे पहिलेच पुस्तक आहे हे खरे वाटू नये इतके चांगले उतरले आहे . पुस्तक मुळातच (विकत घेवून!) वाचावे असे आहे .

    चिदानंद पाठक, पाषाण; पुणे
    २९.१०.२०११