Antajichi Bakhar Nanda Khare अंताजीची बखर नंदा खरे
उपहासात्मक शैलीतील ऐतिहासिक कादंबरी
नंदा खरे यांचे ' अंतोजींची बखर ' हे विनोदी अंगाने जाणारे पुस्तक आहे. पेशवाईचा काळ चित्रित करणार्या या बखरीत त्या वेळचे समाजकारण , राजकारण , राज्यांची व्यवस्था इत्यादिंचे यथोचित वर्णन आढळते. त्या काळातील घडामोडींवर अतिशय उपहासात्मक अशी टीका लेखकाने केली आहे. हे लेखनवैशिष्ट्य पुस्तकभर सोबत करते. जोडीला बखरीचा घाटही मजा आणतो.
इतिहासकाळाचे विश्लेषण करताना , सरकार किंवा राज्यकतेर राज्याच्या नावावर करीत असलेली चक्क लूट अनेक प्रसंगांतून स्पष्ट होते. त्यांची छुपी टगेगिरी उघड होते. पेशवेकाळात ज्या ज्या ' मोहिमा ', ' लढाया ' झाल्या , त्यांत मोजक्या वेळांनाच राज्याचा फायदा होता , बाकी व्यक्तिगत हिताचीच प्रेरणा प्रबळ होती , याला या पुस्तकामुळे दुजोरा मिळतो.
| SKU |
MB-850-MANV-40 |
| Weight |
0.50 lbs
|
| MSRP (Rs) |
248.40 |