Alpasankhya Vijay Padalakar अल्पसंख्य विजय पाडळकर राजहंस प्रकाशन
एक राष्ट्रियक्रुत बँकेतील इलाही महमूद सुभेदाराची ही कहाणी आहे.
अल्पसंख्य या शब्दाचा प्रचलित अर्थ आहे तो साधा, सरळ नाही हे आपल्या सर्वाना चांगलंच ठाऊक आहे. त्याला राजकीय, सामाजिक अशी अनेक अंगे आहेत. म्हणूनच या नावाची कादंबरी जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा आपल्या मनात नकळतच एक पूर्वग्रह तयार होतो. एखाद्या विशिष्ट धर्माविषयीचं, जमातीविषयीचं कथन यात असणार हे आपण मनोमन जाणलेलं असतं. मात्र कथानक जसजसं पुढे सरकत जातं तसतसा अल्पसंख्य या शब्दाविषयीचा आपला अंदाज थोडासा चुकतोच. ती कहाणी फक्त त्या ठराविक धर्माची राहत नाही. ती बनून जाते तुमच्या- माझ्या- आपल्यासारख्या सामान्य माणसांची. अशी माणसं, ज्यांना कुठल्याही धर्मात- पंथात अडकून राहायचं नाही. त्यांचा धर्म फक्त एकच आहे मानव-धर्म! अन अशा विचारांची माणसं असतात अल्पसंख्य!
| SKU |
MB-339-RAJ-24 |
| Weight |
0.80 lbs
|
| MSRP (Rs) |
276.00 |